Ladki Bahin Yojana | ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin) योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि त्याचवेळी संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) किंवा श्रावणबाळ योजनेचा (Shravanbal Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांचे अनुदान फेब्रुवारी महिन्यापासून बंद होण्याची शक्यता आहे. एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने (District Administration) अशा लाभार्थ्यांचे आधारकार्ड (Aadhaar Card) आणि बँक पासबुक (Bank Passbook) तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (Ladki Bahin Yojana)
एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी, शासनाने (Government) ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या माहितीशी ताडून पाहिली जात आहे.
शासनाचा नियम काय सांगतो?
शासनाच्या नियमानुसार, एका लाभार्थ्याला एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे, जर एखादी महिला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेत असेल आणि त्याचवेळी ती संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचाही लाभ घेत असेल, तर तिचे यापैकी एका योजनेचे अनुदान बंद होणार आहे.
निवडणुकीनंतर ‘लाडकी बहीण’ योजनेचा दुसरा हप्ता 25 जानेवारी रोजी जमा झाला आहे. परंतु, या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना फेब्रुवारी महिन्यापासून ‘लाडकी बहीण’ योजनेची रक्कम मिळणे बंद होण्याची शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana)
लाभार्थ्यांनी काय करावे?
ज्या लाभार्थ्यांना एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ मिळत आहे, त्यांनी लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून, या संदर्भात योग्य ती माहिती द्यावी. तसेच, आवश्यक कागदपत्रे जमा न केल्यास, संबंधित लाभार्थ्यांच्या योजनांचा लाभ बंद होऊ शकतो.
“शासन निर्णयाप्रमाणे एकाच योजनेचा लाभ मिळेल. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांचे अनुदान बंद होणे शक्य आहे,” अशी माहिती प्रभारी तहसीलदार उत्तम बहुरे (Uttam Bahure) यांनी दिली. (Ladki Bahin Yojana)
Title : Ladki Bahin Yojana Anudan Verify Aadhar Bank Details