लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी होणार की नाही? तटकरेंनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana l राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना गेमचेंजर ठरली आहे. या योजनेला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशातच या योजनेद्वारे महिलांना या महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहेत. मात्र आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार का? यासंदर्भात माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

लाडक्या बहीण योजनेची छाननी होणार का? :

आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत असताना महायुती सरकारने ती योजना अगदी व्यवस्थितपणे राबवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राज्यातील 2 कोटी 40 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. याशिवाय कोणत्याही योजनेची छाननी केली जाणार नाही.

मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुळात तक्रार याव्या लागतात. त्यामुळे मी आता त्या विभागाची मंत्री नाही. परंतु, तेव्हा अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे त्याबद्दलची माहिती देखील नाही. तसेच योजनेची छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे चौकशी करावी लागते असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

Ladki Bahin Yojana l छाननी असल्यास तक्रारींच्या आधारावर केली जाणार :

याशिवाय त्या पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कोणी तक्रारी केल्या तर त्या तपासल्या जातील. तसेच मी मंत्री असताना अशा कोणत्याही तक्रारी आल्या नव्हत्या. त्यामुळे आत्ता आल्यात की नाही ते देखील मला माहिती नाही. तसेच कोणीही अशा पद्धतीने तक्रार केली असेल तर विभागाचे आधिकारी निर्णय घेतात.

मात्र आता तक्रारी आल्यात की नाही यासंदर्भातील मला माहिती नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे. तसेच यासंदर्भात प्राथमिक छाननी करून आधार सिडिंग करून लाभार्थी निवडले जात आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवताना जर छाननी असल्यास तक्रारींच्या आधारावरच केली जाणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

News Title : Ladki Bahin Yojana application scrutiny

महत्वाच्या बातम्या- 

ते ही पुन्हा आले! विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर

“लाडक्या बहिणींना नोटीस पाठवून पैसे परत…”, संजय राऊतांनी केला धक्कादायक खुलासा

“…तर रवी राणा राजीनामा देतील”; नवनीत राणांचं ओपन चॅलेंज

थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार, IMD कडून अलर्ट

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .