लाडक्या बहीणींनो डिसेंबरचा हप्ता ‘या’ दिवशी येणार?, मोठी माहिती समोर

Ladki Bahin Yojana | महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत वरदान ठरलेल्या ‘लाडकी बहीण योजना’बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा केली. या योजनेला राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. निवडणुकीत लाडक्या बहीणींनी महायुतीला कौल दिला. त्यामुळे ही योजना गेमचेंजर ठरली.(Ladki Bahin Yojana )

आता महायुतीचे सरकार पुन्हा आले आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडक्या बहीणींच्या हप्त्यात वाढ करत 2100 रुपये देणार, असं म्हटलं होतं. आता महायुती आपला शब्द पाळणार की नाही, त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. निकाल लागल्यानंतर त्याच्या दोनच दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी स्वतः योजनेबाबत मोठी घोषणा केली होती.

डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?

शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहि‍णींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. येत्या दोन दिवसांत महायुतीचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन होताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana)

हा निर्णय घेतल्यानंतर डिसेंबर महिन्यातच लाडक्या बहीणींच्या खात्यावर पैसे जमा होतील, असं म्हटलं जातंय. महिलांच्या खात्यावर आता 1500 ऐवजी 2100 रुपये येणार, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा हप्ता बँक खात्यावर कधी जमा होणार, याची प्रतिक्षा आता महिलांना लागली आहे.

1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार

दरम्यान, आतापर्यंत राज्यात 2 कोटी 26 लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत. निवडणुकीमुळे मध्यंतरी योजनेचे हप्ते तूर्तास थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याने घेतला होता. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

तसेच, सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील एकत्रित जमा केले होते. त्यामुळे महिलांना आता डिसेंबरमधील हप्ता कधी मिळणार, याची प्रतिक्षा आहे. या डिसेंबरमध्ये महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत.(Ladki Bahin Yojana)

News Title –  Ladki Bahin Yojana December 2024 installment

महत्त्वाच्या बातम्या-

महायुतीच्या मंत्रीमंडळात ‘या’ महिला आमदारांची लागणार वर्णी?

मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला? शिंदे व पवार गटाला कोणती पदे मिळणार; पाहा यादी

कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, PF चे पैसे काढणं होणार सोप्पं

ठरलं! देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?, तर, शिंदे-अजितदादा..

CM पदाच्या बदल्यात शिंदेंना हवीत ‘ही’ मोठी खाती?, अजितदादांच्या वाट्याला काय येणार?