Ladki Bahin Yojana | महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने या योजनेच्या पैशांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती.(Ladki Bahin Yojana)
महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2100 देण्याची घोषणा करण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडूनही महालक्ष्मी योजनेबाबत आश्वासन देण्यात आलं होतं. मविआ सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना 3000 रुपये देणार अशी घोषणा महाविकास आघाडीने केली होती.
सुधीर मुनगंटीवार यांनी दिली मोठी अपडेट
मात्र, विधानसभेत जनतेने महायुतीला कौल दिला. महायुतीचा दणदणीत विजय झाला. तर मविआला म्हणावे तसे यश मिळाले नाही. आता निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी महायुती सरकार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विधानसभेत ही योजना गेम चेंजर ठरली. यामुळे महायुतीला बहुमत प्राप्त झाले. आता लाडक्या बहिणी 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत.
या संदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून द्यायचा याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतला जाईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पामध्ये याबाबत चर्चा करून हा हप्ता नेमका कसा द्यायचा ते ठरवलं जाईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी ही योजना सुरूच राहणार असून अडीच लाखांच्यावर ज्यांचे उत्पन्न आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. (Ladki Bahin Yojana)
डिसेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार?
दरम्यान, आतापर्यंत राज्यात 2 कोटी 26 लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत. निवडणुकीमुळे मध्यंतरी योजनेचे हप्ते तूर्तास थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याने घेतला होता. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
तसेच, सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील एकत्रित जमा केले होते. त्यामुळे महिलांना आता डिसेंबरमधील हप्ता कधी मिळणार, याची प्रतिक्षा आहे. या डिसेंबरमध्ये महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत.(Ladki Bahin Yojana)
News Title – Ladki Bahin Yojana December installment update
महत्त्वाच्या बातम्या-
अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार
कंबोज म्हणाले; “गजाभाऊला उचलून आणणार”; ठाकरे गटाचा नेता म्हणाला…