लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?, मोठी माहिती समोर

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana | महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण योजना’ची घोषणा केली. या योजनेला राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आतापर्यंत राज्यात 2 कोटी 26 लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत. मात्र, सध्या योजनेचे हप्ते तूर्तास थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याने घेतला आहे. (Ladki Bahin Yojana)

राज्यात विधानसभा निंवडणुक असल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे तूर्तास योजनेचे हप्ते हे थांबवण्यात आले आहेत. आचारसंहिता असल्याने तब्बल 10 लाख महिला नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्यापासून वंचित राहिल्या आहेत. तर, सरकारने इतर महिलांच्या बँक खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच जमा केला आहे.

डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?

ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या खात्यावर 3 हजार जमा करण्यात आले आहेत. मात्र, वेळेअभावी केवळ 10 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. आता महिला या डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची वाट बघत आहेत. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच, सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील एकत्रित जमा केले आहेत. त्यामुळे महिलांना आता डिसेंबरमधील हप्ता कधी मिळणार, याची प्रतिक्षा आहे.

याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. कुणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही. सावत्र भावांनी या योजनेत खोडा घातला. त्यांना जोडा दाखवा, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. तसंच, आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हफ्ता बहिणींना मिळेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. (Ladki Bahin Yojana)

राज्यात पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. 23 नोव्हेंबररोजी निकाल लागणार आहे. म्हणजे महिलांना आता थेट डिसेंबर महिन्यातच योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. सध्या तरी आचारसंहिता असल्याने योजनेचे वितरण हे थांबवण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana)

News Title – Ladki Bahin Yojana December installment  

महत्त्वाच्या बातम्या-

कॉँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर, 48 नावांची झाली घोषणा!

आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार अत्यंत शुभ; मिळणार पद, पैसा आणि प्रतिष्ठा

मोठी बातमी! शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

ठाकरेंनी बड्या नेत्याची उमेदवारी नाकारली!

धक्कादायक! 85 विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी; काय आहे प्रकरण

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .