लाडक्या बहीणींना सरकारचा धक्का, ‘ही’ एक चूक अन् तुमचा अर्ज होणार बाद

Ladki Bahin Yojana Eligibility Rules

Ladki Bahin Yojana | महायुती सरकारची ‘लाडकी बहीण योजना’ अजूनही सुरू आहे. सरकारने म्हटल्यावरप्रमाणे महिलांना डिसेंबरचा हप्ता देखील देण्यात आलाय. मागच्याच महिन्यात त्याचे वितरण देखील करण्यात आले. अशात शासनाने योजनेसंबंधी एक मोठा निर्णय घेतलाय. योजनेचा गैरवापर करुन ज्यांनी पैसे घेतले, अशा तक्रारींची आता तपासणी केली जाणार आहे.मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana)

शासनाने लाडकी बहीण योजना पात्रतेसाठीच्या निकषात कोणतेच बदल केले नाहीत, मात्र हे नियम कठोर करण्यात येणार आहेत. ज्या भागातून तक्रारी आल्या तेथील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. जर अर्जातील माहितीमध्ये तफावत दिसली तर अशा महिलांचे अर्ज बाद केले जातील.

कोणत्या महिला अपात्र ठरणार?

-वार्षिक एकत्रित उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असेल,तर अपात्र ठरणार
-दुचाकीच्या वर चारचाकी असेल तर अपात्र ठरवले जाईल
-आधार आणि बँक नावात तफावत असेल तर त्या महिला अपात्र ठरतील
-ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
-या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे.
-ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही.
-कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील तर अशा महिला अपात्र ठरतील (Ladki Bahin Yojana)
-तसेच इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

तसेच पुढे बोलताना आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की, “तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत.आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल”

दरम्यान, जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून आतापर्यंत 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 2 कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरले. तब्बल दोन कोटी 34 लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते.तसेच डिसेंबरचा हप्ता देखील नुकताच बँकेत जमा करण्यात आलाय. (Ladki Bahin Yojana)

News Title-  Ladki Bahin Yojana Eligibility Rules

महत्वाच्या बातम्या-

नवीनवर्षात इंधनदरात मोठा दिलासा, पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?

नववर्षातील आज पहिली विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींची करणार इच्छापूर्ती!

धनंजय मुंडे राजीनामा देणार?, स्वतः माहिती देत केला मोठा खुलासा

वाल्मिक कराडचा एन्काउंटर होणार???, आताच्या घडीची मोठी माहिती समोर!

Pune: पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाच्या सोडतीबाबत सरकारनं दिली नवी माहिती

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .