आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

Ladki Bahin Yojana l राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे. या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद येत आहे. यो योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना तब्बल 3000 रुपये राज्य सरकारच्यावतीने दिले जाणार आहेत. अशातच आता या योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.

या तारखेला जमा होणार पहिला हप्ता :

राज्यभरातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद येत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले आहेत. मात्र अद्यापही या योजनेचे अर्ज भरण्याचे काम जोमाने सुरु आहे.

राज्य सरकारने या योजनेची अंतिम मुदत ही 15 ऑगस्ट दिली होती, मात्र ती मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. राज्यातील महिला 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहि‍ण योजनेचा अर्ज करू शकतात. अशातच आता राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींसाठी आणखी एक गुडन्यूज दिली आहे. या योजनेचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच 3000 रुपये ओवाळणी म्हणून मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

Ladki Bahin Yojana l राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रम होणार :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा येत्या 17 ऑगस्टलाच मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शासन दरबारी निर्णय देखील झाला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे बहिणींच्या बँक खात्यावर वितरीत केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

News Title : Ladki Bahin Yojana First Installment

महत्त्वाच्या बातम्या-

खुशखबर! 12 वी पास तरुणांना ‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

“नवनीत राणांना आवरा, अन्यथा..”; शिंदे गटाच्या नेत्याचा थेट इशारा

IRCTC चं श्रावण स्पेशल टुर पॅकेज; ‘या’ तीर्थक्षेत्रांना स्वस्तात भेट देण्याची सुवर्णसंधी

म्हाडा लॉटरीसाठी अशाप्रकारे करा अर्ज; घरांची किंमत किती असेल?

मोठी बातमी! विनेश फोगाटची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल