Ladki Bahin Yojana l मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लाभार्थी आतुरतेने वाट पाहत असलेल्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत (Installment) राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. २६ जानेवारी २०२५ पूर्वी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, “२६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या महिन्यासाठी आम्हाला ३,६९० कोटी रुपये निधी मिळणार आहे. यासाठी आर्थिक नियोजन सुरू आहे. २६ तारखेच्या तीन ते चार दिवसांत लाभ जमा होईल.” पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “२६ जानेवारीच्या आत वितरणाची सुरुवात आम्ही करत आहोत. या महिन्याचा १५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे.”
Ladki Bahin Yojana l विरोधकांचा टोला आणि पुढील नियोजन :
यावेळी बोलताना आदिती तटकरे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “विरोधक याआधीपासूनच या योजनेविरोधात आरोप करत होते, पण निवडणुकीवेळी (Election) त्यांच्या जाहीरनाम्यात (Manifesto) त्यांनीही अशीच योजना दिली होती,” असा टोला त्यांनी लगावला. “आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेल्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. आता आम्ही फेब्रुवारी महिन्याचीही तयारी करत आहोत,” असेही त्या म्हणाल्या.
“अर्थसंकल्प (Budget) सादर झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात खंड पडणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. डिसेंबर महिन्यात आम्ही २ कोटी ४७ लाख लाभार्थ्यांना लाभ दिला होता,” अशी माहितीही त्यांनी दिली.
लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण :
मंत्री आदिती तटकरे यांच्या या घोषणेमुळे राज्यभरातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याने, त्यांना आर्थिक हातभार लागणार आहे.
News Title: Ladki Bahin Yojana: Installment Date Declared
महत्वाच्या बातम्या-
सैफ अली खानच्या आधी ‘या’ अभिनेत्यांच्या घरीही झालीये घुसखोरी, नावं ऐकून धक्का बसेल
सैफ अली खान हल्ला प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा समोर!
NEET UG ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी!
एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी गुडन्यूज, महामंडळानं केली सर्वात मोठी घोषणा
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गात मोठा बदल?, आढळराव पाटलांच्या आरोपांनी खळबळ