Ladki Bahin Yojana | राज्याचे हिवाळी अधिवेशन नुकतेच नागपूर येथे पार पडले. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं देखील फडणवीस म्हणाले होते. (Ladki Bahin Yojana)
राज्याचे हिवाळी अधिवेशन आता संपले आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे हे थेट नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. तसेच, महिलांना यापुढे 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी योजनेच्या रक्कममध्ये वाढ केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं.
जानेवारीत मिळणार पुढील हप्ता?
महायुती सरकार पुन्हा आले तर महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, असं महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. अशात राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले आहे. त्यामुळे महायुती सरकार दिलेला शब्द पाळणार का?, त्याकडे सर्वांच्या नजरा असतील. (Ladki Bahin Yojana)
दरम्यान, आतापर्यंत 2 कोटीहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. सरकारकडून जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत, 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
-21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
-ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही
-ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
-कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी तत्त्वावर नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही
-ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही
-संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana )
-ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक कर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही
News Title – Ladki Bahin Yojana installments can be received in January
महत्त्वाच्या बातम्या-
“महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, ते चुकून भारताचे…”; प्रसिद्ध गायकाचं वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्रातील राजकारण तापणार?; राहूल गांधी आज परभणीत, सूर्यवंशी कुटुंबाला भेटणार
छगन भुजबळांची पुढील भूमिका ठरली?, शरद पवारांचं कौतुक करत म्हणाले…
पुणे हादरलं! मद्यधुंद डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्यांना चिरडलं, मृतांचा आकडा समोर
मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होणार, भोलेनाथ आज ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न