लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार, साताऱ्यातील घटनेनं मोठी खळबळ

Ladki Bahin Yojana | राज्यभरात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचाच बोलबाला आहे. महायुती सरकारने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बहीणींच्या खात्यावर योजनेचे पैसे पाठवून त्यांना मोठी भेट दिली. या योजनेसाठी आतापर्यंत लाखो अर्ज करण्यात आले आहेत. अनेक बहीणींना योजनेचे पैसे देखील मिळाले आहेत.अशात साताऱ्यात लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार झाल्याचं उघड झालंय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सातारामधील एका पट्ट्याने चक्क 30 अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रूपये लाटले आहेत. (Ladki Bahin Yojana )

साताऱ्यातील व्यक्तीने चक्क 30 अर्ज करून लाटले हजारो रुपये

नवी मुंबईतील खारघरमधील महिला पुजा प्रसाद महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर निलेश बाविस्कर यांनी याचा तपास केला. तेव्हा पुजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाले असल्याचे समोर आले.

पुजा महामुनी यांचा अर्ज तर अप्रूव्हड झाला पण त्यांच्या आधार कार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाइल नंबर अॅड  झाला असल्याचे समोर आले. पुढे याचा खोल तपास केला असता असे आढळून आले की, या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल 30 अर्ज भरले होते आणि विशेष म्हणजे या व्यक्तीला 26 वेळा पैसे देखील त्याच्या खात्यात आले. (Ladki Bahin Yojana )

3 हजारप्रमाणे या व्यक्तीने तब्बल 78 हजार रुपये शासनाकडून लाटले. या सर्व घटनेची तक्रार आता पनवेल तहसिलदारांकडे करण्यात आली असून याचा आता अधिक तपास केला जात आहे. काही दिवसांपूर्वी देखील अशीच एक घटना समोर आली होती.यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील जाफर गफ्फार शेख या तरुणाने अर्ज केला नसताना देखील त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाले होते. यामुळे योजनेतील भोंगळ कारभार उघड झाला.

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने अजून मुदतवाढ दिली आहे.योजनेंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. मात्र, ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला त्यांना योजनेचे फक्त 1500 रुपये मिळणार आहेत.

योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळतील. लाडकी बहीण योजनेत नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. पण, आता त्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana )

News Title : Ladki Bahin Yojana man use 30 adhar number for scheme

महत्वाच्या बातम्या- 

‘या’ राशींवर होईल सुखाचा वर्षाव, नवीन कार्य करण्यास शुभ दिवस

क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार WTC 2025 फायनल! ICCकडून तारीख जाहीर

पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला गेले तडे!

पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार

… तर यापुढे अहमदनगर नव्हे तर ‘अहिल्यानगर’; नामांतरास ग्रीन सिग्नल