फॉर्म भरुनही पैसे आले नाही त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर!

Ladki Bahin Yojana | राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिलांकडून योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे.

लाडकी बहिण योजनेबाबत नवी अपडेट

बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. तर काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नवीन अपडेट दिली आहे.

एकनाथ शिंदे हे सध्या राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. नुकतीच एकनाथ शिंदे यांची सोलापुरात एक प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत त्यांनी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे अद्याप आलेले नाहीत, त्यांना ते पैसे कधी मिळणार याबद्दल भाष्य केलं आहे.

लवकरच त्यांच्याही खात्यात पैसे येणार- एकनाथ शिंदे

ज्या बहिणींच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत, त्यांना मी वंचित ठेवणार नाही. लवकरच त्यांच्याही खात्यात पैसे येणार. नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचे पैसे खात्यात जमा केले जातील, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे. या योजनेने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. आता त्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. आता महिलांचा सन्मान करा, असं माझं सगळ्या भावजींना सांगणं आहे. पूर्वी काही खरेदी करायची असेल तर बहिणींना घरात हात पुढे करावा लागत होता. मात्र आता तशी परिस्थिती नाही, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

नरेंद्र मोदी महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार?

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नको त्या गोष्टी माझ्या तोंडी..”

‘अटक होऊ शकते म्हणून अजित पवारांनाही घाम फुटला होता’; खळबळजनक दावा समोर

मुख्यमंत्र्यांचं शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका