Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) राज्यातील महिला या योजनेचा फॉर्म भरताना दिसत आहेत. सोलापूरातील अंगणवाडी सेविकांनी याबाबत एक महत्त्वाची भूमिका घेतली आहे. लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणार नसल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ही भूमिका स्पष्ट केली आहे.
ऑनलाईन फॉर्म भरणार नाही
सोलापूरात लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे. काही ठिकाणी या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे घेत असल्याचं समोर आलं आहे. तर काही ठिकाणचं सर्व्हर डाऊन असल्याचं दिसून आलं आहे. अशातच आता अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन फॉर्म भरणार नसल्याचं सांगितलं आहे.
अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का? असा सवाल अंगणवाडी सेविकांनी केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं आहे. कोणतीही योजना आली की अंगणवाडी सेविकांना त्याचं काम दिलं जातं. मात्र अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढीसाठी आंदोलन सुरू असताना त्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही, असं अंगणवाडी सेविकांची तक्रार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेली योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसल्यास तर अद्यापही अर्जाची तारीख संपलेली नाही. यामुळे तुम्ही अर्ज करू शकता. लाभार्थी महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत.
‘या’ योजनेसाठी महिलांची पात्रता
महाराष्ट्र रहिवासी
विवाहीत, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
महिलांचे 18 ते 65 वय वर्षे असावे
लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 2.30 लाखांपेक्षा अधिक नसावे
News Title – Ladki Bahin Yojana On Solapur Anganwadi Sevika Denied To Fill Online Form Benificially
महत्त्वाच्या बातम्या
महिलांनो ‘या’ दोन गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होऊ शकतो Breast Cancer
कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!
कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला देखील पाऊस झोडपणार
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीमद्वारे महिन्याला कमवा 10 हजार रुपये; जाणून घ्या अधिक
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची धुरा कुणाकडे असणार?, मोठी माहिती आली समोर