‘या’ लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार? जाणून घ्या लाभ कसा मिळतोय?

Ladki Bahin Yojana l राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सरकारने ही योजना जुलै महिन्यापासून सुरु केली आहे. अशातच आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात देखील झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कित्येक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, नेमका कोणत्या महिलांना 4500 रुपये मिळणार? तर याबाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

महिलांना मिळाली गुड न्यूज :

राज्य सरकारने रक्षाबंधनच्या काही दिवसांआधी लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात केली होती. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण मिळून 3000 रुपये देण्यात आले आहेत. तसेच 31 ऑगस्टनंतर अर्ज करणाऱ्या महिलांना देखील लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अशातच आता या योजनेअंतर्गत निधीवाटपाचा दुसरा टप्पा देखील चालू करण्यात आला आहे. मात्र आता याची सुरुवात ही प्रत्यक्षपणे झाली आहे. राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरुवात देखील सुरु झाली आहे. मात्र ज्या महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये आलेले आहेत, ते पैसे माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट या महिन्याच्या टप्प्यातील असणार आहे.

Ladki Bahin Yojana l दुसऱ्या टप्प्यात नेमके कोणाला पैसे मिळणार? :

राज्यातील महिला या योजनेमुळे संभ्रमात आहेत. कारण या योजनेतील कोणत्या पात्र महिलेला 3000 रुपये मिळणार आणि कोणत्या महिलेला 4500 रुपये मिळणार? यामुळे कित्येक महिलांचा गोंधळ उडत आहे. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात सुरु झाली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतरित्या शुभारंभ देखील करण्यात आला आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे बँक खात्यावर देण्यात आले होते. मात्र आता या योजनेचा दुसरा टप्पा देखील चालू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित मिळून 3000 हजार दिले जाणार आहेत.

मात्र आता ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये देखील मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये दिले जाणार आहेत. मात्र त्यासाठी तुमच बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे.

News Tite : Ladki Bahin Yojana Second Installment

महत्त्वाच्या बातम्या-

गणपती बाप्पा संदर्भात महत्वाची बातमी; थेट होणार पोलिसांची कारवाई

देशात ‘हा’ आजार घालतोय धुमाकूळ; WHO ने दिला इशारा

“हार्दिक पांड्यावर माझं प्रेम, तो माझा..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

आयफोनला विसरा! 108MP कॅमेरा असलेला भन्नाट फोन लाँच; किंमत फक्त…

महिन्याच्या शेवटी दिलासा, सोन्याचे भाव उतरले; काय आहेत सध्या किमती?