लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार का? आदिती तटकरेंनी दिलं उत्तर

Ladki Bahin Yojana l मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै महिन्यापासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1500 रुपये प्रतिमहा जमा होत आहे. आत्तापर्यंत या योजनेचे पाच हप्ते जमा झाले आहेत. अशातच आता या योजनेचा सहावा हप्ता देखील लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. मात्र या योजनेच्या अर्जांची छाननी होणार का? असा प्रश्न महिलांना पडला आहे. तर आता आपण यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

पुन्हा नोंदणी सुरु होणार का? :

लाडकी बहीण योजनेची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता तब्बल 12 लाख 87 हजार बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात उर्वरीत लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

याशिवाय विविध तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांना या योजनेसाठी अर्ज करता आलेला नाही. त्यामुळे नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार असा प्रश्न देखील राज्यातील महिलांकडून विचारला जात आहे. मात्र त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “नोंदणी करण्याची शेवटची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत होती. तसेच तोपर्यंत राज्यातील अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी देखील केली आहे. मात्र अद्याप पुन्हा नोंदणी सुरू करण्यासंदर्भात कसलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे पात्र महिलांपर्यंत सध्या आम्ही सन्माननिधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

Ladki Bahin Yojana l अर्जांची छाननी होणार? :

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निकष बदलण्यात येणार असल्याची चर्चा वारंवार होती. त्यामुळे राज्यातील अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा एकदा छाननी होणार का? यावर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, यासंदर्भातील भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे.

“त्यामुळे आता यासंदर्भात तक्रारी आल्या असतील तर योग्यपद्धतीने तपासून घेतल्या जातील. याशिवाय सरसकट पुनर्पडताळणी घेण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच नव्याने निकषही बदलले नाहीत.” असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

News Title –  Ladki Bahin Yojana statement on aaditi tatkare 

महत्त्वाच्या बातम्या-

“20-22 वर्षांची पोरं हवेत गोळीबार करतात, ‘गँग्स ऑफ बीड’चे धनी कोण?”

2100 की 1500?, येत्या चार दिवसात खात्यात येणार पैसे; महिलांनो ‘असं’ करा चेक

दुःखद घटना! लष्कराच्या गाडीला भीषण अपघात, ‘इतक्या’ जवानांचा जागीच मृत्यू

विनोद कांबळींच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे सरसावले, दिलं मोठं आश्वासन

देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव, मनातील इच्छा देखील होतील पूर्ण!