Ladki Bahin Yojana | महायुती सरकारचा उद्या 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत लाडकी बहीण योजनेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. (Ladki Bahin Yojana)
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने या योजनेच्या पैशांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2100 देण्याची घोषणा करण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडूनही महालक्ष्मी योजनेबाबत आश्वासन देण्यात आलं होतं. मविआ सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना 3000 रुपये देणार अशी घोषणा महाविकास आघाडीने केली होती.
सरकारकडून अर्जांची फेरतपासणी होणार
निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी आता महायुती सरकार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आता लाडक्या बहिणी 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, त्यापूर्वीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana)
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे. 2 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतला आहे. मात्र आता सरकार फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यावर भर देणार आहे. योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासले जाणार आहे. यामुळे आर्थिक सहाय्य करताना पारदर्शकता येईल, असं सांगितलं जातंय.
काही मीडिया रिपोर्टनुसार, या योजनेंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास सर्व 2 कोटी अर्जदार महिलांना या तपासणीत समाविष्ट केलं जाईल. या प्रक्रियेद्वारे, खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलटतपासणी केली जाईल. (Ladki Bahin Yojana)
‘या’ अटी तपासल्या जाणार
उत्पन्नाचा पुरावा : अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहे, ज्याची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये आहे
आयकर प्रमाणपत्र : लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जांची छाननी केली जाईल.(Ladki Bahin Yojana)
सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी : निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांची तपासणी केली जाईल. यात त्रुटी आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
त्याचबरोबर पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
तसेच प्रत्येक कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच हा लाभ दिला जाणार आहे. (Ladki Bahin Yojana)
News Title – Ladki Bahin Yojana terms and conditions
महत्त्वाच्या बातम्या :
महायुतीत कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?, सर्वात मोठी अपडेट समोर
बळीराजाची चिंता वाढली, IMD चा राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा!
दिल्लीत दोन दिवसांपासून अजित पवार वेटिंगवर; अमित शाहांकडे ‘या’ मागण्या करणार?
आज देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशींच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार!