राज्यातील लेकीही होणार मालामाल; ‘या’ योजनेतून लेकींना मिळणार दणकून पैसे

Ladki Lek Yojana

Ladki Lek Yojana l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नवनवीन योजना राबवत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेला राज्यभरातून महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अशातच राज्यात लागू असलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेद्वारे मुलींना आर्थिक मदत दिली जाते. मात्र कित्येक मुलींना या योजनेबद्दल माहिती नाही. त्यामुळे आज आपण या योजनेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

‘या’ योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात? :

राज्य सरकारच्या ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत मुलींना घसघशीत रक्कम मिळते. या योजनेनुसार एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत तिला तब्बल 1 लाख 1 हजार रुपये टप्प्याने देण्यात येत असतात. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक असलेल्या कुटुंबात 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य राज्य सरकार मार्फत दिले जाते.

या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 5000 रूपये तिच्या कुटुंबाला मिळतात. तसेच ती मुलगी इयत्ता पहिलीत गेली की तिला पुन्हा सहा हजार रूपये दिले जातात. याशिवाय सहावीत गेली की सात हजार रुपये दिले जातात. तसेच त्या मुलीच्या पुढच्या शिक्षणासाठी देखील राज्य सरकारकडून पैसे दिलेजातात. त्यानंतर ती मुलगी इयत्ता अकरावीत गेली ती आठ हजार रुपये दिले जातात. याशिवाय तील 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तब्बल 75 हजार रूपये सरकारकडून दिले जातात.

Ladki Lek Yojana l या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय आहेत? :

1 एप्रिल 2023 या दिवसानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सरकारने विशेष योजना आखली आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना ही योजना लागू होते. ज्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. ते कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. तसंच या कुटुंबाचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल.

तुम्हाला देखील या योजेचा फायदा घेयचा असेल तर तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणच्या अंगणवाडीत तुम्ही अर्ज करू शकता. या अर्जात तुम्हाला सर्व वैयक्तिक माहिती भरावी लागेल. याशिवाय मोबाईल नंबर, रहिवासी पत्ता, बँक खात्याची माहिती व मुलीची माहिती देऊन हा अर्ज भरायचा आहे.

News Title- Ladki Lek Yojana

महत्त्वाच्या बातम्या –

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याची भाजपमध्ये एंट्री

चुकीच्या तेलाने बिघडू शकते आरोग्य, मग स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?

“कंगना संसदेत बसायच्या लायकीची नाही, तिने..”; कुणी केली जहरी टीका?

सतर्क! वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार

गणेशोत्सवात ‘या’ नवसाला पावणाऱ्या बाप्पांचे घ्या दर्शन, सर्व संकटे होतील दूर

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .