बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेडी बाहुबली! 37व्या वर्षीही महिलेचा साडीत जबरदस्त वर्कआऊट

पुणे | पुण्यात राहणारी एक 37 वर्षीय महिला चक्क साडीत वर्कआऊट करते. साडीत वर्कआऊट करताना त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डॉ. शर्वरी इनामदार असे या महिलेचे नाव आहे.

या व्हिडिओत त्या साडीवरच पुशअप्स, डेड लिफ्ट आणि इंक्लाइन बेंच प्रेस सारखी एक्सरसाइज करताना दिसत आहेत. वेट ट्रेनिंग शिवाय आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू शकत नाही. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता त्या साडी नेसून वेट ट्रेनिंग घेतात, असं शर्वरी यांनी सांगितलं.

डॉ. शर्वरी इनामदार आयुर्वेदातल्या एमडी आहेत. त्या स्वतःचं क्लिनिकही चालवतात. पण पॉवर लिफ्टिंग खेळाडू हीच त्यांची खरी ओळख. पॉवर लिफ्टिंगपटू शर्वरी यांनी चारवेळा स्ट्राँग वुमन होण्याचा मान पटकावलाय.

दरम्यान, डॉ. शर्वरी यांनी सांगितले, की 4 वर्षांपूर्वी त्या स्वतः फिटनेससाठी वॉकिंग, रनिंग, योगा करत होत्या. मात्र, तरीही त्यांना काही कमतरता जाणवत होती. डॉ. शर्वरी यांचे पतीही आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्यांनी शर्वरी यांना वेट ट्रेनिंग आणि जिम जॉइन करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या हळू-हळू वेट ट्रेनिंग करू लागल्या.

 

थोडक्यात बातम्या – 

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात लहान मुले कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढलं

मास्क न घालणाऱ्यांना झेडपी तिकीट नाही- सुप्रिया सुळे

‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; आप आणि काँग्रेसची ‘या’ संताला ऑफर???

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 02 कोरोनाबाधितांचा मृत्यू

देवाची सावली! उद्यान एक्सप्रेससमोर झोपून देखील महिला जिवंत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More