बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेडी डॉन, गर्ल्स हॉस्टेलमधून चालवायची गँग, उद्योगपतींना फोन करुन…

रांची | झारखंडमधील एका कुख्यात गँगस्टरने पोलिसांना हैराण करुन सोडलं आहे. अशातच आता या गँगस्टरची प्रेयसी देखील समोर आली आहे. विशेष म्हणजे गँगस्टरची ही प्रेयसी देखील त्यांच्या गँगमध्ये सामिल आहे. संबंधित गुंडाचं नाव सुजित सिन्हा असं आहे. तर त्याच्या प्रेयसीचं नाव प्रियांका उर्फ खुशबु उर्फ सृष्टी असं आहे.

सुजितची प्रेयसी रांचीमधील कडरु येथील एका गर्ल्स हाॅस्टेलमध्ये राहत होती. प्रियंकाने डाल्टेनंगच्या एका काॅलेज मधून तिचं बिएचं शिक्षण पुर्ण केलं आहे. प्रियंका या हाॅस्टेलमध्ये एक विद्दार्थी म्हणून राहत असून तिथून ती लपून गँग चालवत होती. सुजित आणि प्रियंकाची मैत्री झाल्यानंतर तिने तिच्या दोन जुळ्या भावांना देखील त्यांच्या गँगमध्ये सामील करुन घेतलं. त्यानंतर ती सुजितसाठी काम करु लागली आणि गँगची दुसरी प्रमुख बनली.

प्रियंकाने जमीन व्यापारांची एक यादी बनवली होती. त्याआधारे ती  त्यांना फोन करुन त्यांच्याकडून खंडणी गोळा करत होती. सुजित सिन्हाचे नाव ऐकून अनेकांनी खंडणी देखील दिली. अशाप्रकारे तिने एका व्यापाराकडून खंडणी गोळा करत असताना ती पोलिसांच्या नजरेस आली. तपास केल्यानंतर पोलिसांनी प्रियंकासोबत अजून चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दागिने आणि मोबाईल जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, सुजित सिन्हा तुरुंगात असून प्रियंका त्याच्या संपर्कात राहून गँग चालवत असे. रांचीच्या डब्लू सिंहच्या गँगमधील लव सिंहच्या हत्येप्रकरणात प्रियंकाने हनीट्रॅप रचला होता. यामध्ये तिला अटक देखील करण्यात आली होती. रांचीमधील गुन्हेगारीच्या यादीत एकूण 36 गँग आहेत. ज्यामध्ये सुजित सिंहची गँग सर्वात जास्त सक्रीय आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर पुण्यातील अत्यावश्यक दुकानंही बंद करा’; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीनं एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”

“लोकांनी ऐकलं आहे, आता विरोधी पक्षानेही 1 मेपर्यंत घरीच बसावं”

“जनतेने सहकार्य करावं, आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही”

“फडणवीस पाच वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकतील का?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More