‘लफडा झाला वाकडा तिकडा’, नागराज मुंजळेच्या चित्रपटातील दुसरं भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा व्हिडीओ
मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित झुंड या चित्रपटाचं दुसरं गाणं रिलिज झालं आहे. झुंड या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. झुंड हा एक स्पोर्ट्स ड्रामा असून यामध्ये बच्चन यांनी निवृत्त क्रिडा शिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारली आहे.
‘लफडा झाला वाकडा तिकडा’ असं या गाण्याचे बोल आहेत. अमित भट्टाचार्य यांनी हे गाणं गायलं आहे. अजय आणि अतूल यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे तर अजय गोगोवले यांनी हे गाण गायलं आहे. झुंड हा चित्रपट येत्या 4 मार्चला रिलिज होणार आहे. या गाण्याला दोन मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे.
झोपडीमध्ये राहणाऱ्या मुलांना निवृत्त क्रिडाशिक्षक विजय बारसे भेटतात आणि या मुलांच आयुष्य बदलुन टाकतात. झुंड हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. झुंडची कथा लिहिण्यासाठी नागराज मंजुळे यांना दोन वर्षांचा कालावधी लागला. हा चित्रपट विजय बारसे आणि त्यांच्या शिष्यांवर आधारित आहे.
दरम्यान, लफडा झाला वाकडा या गाण्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ‘इनकी करतुतो पे कभी नही लगता ताला, कोशिश करोंगे तो समझ लेना लफडा झाला साला’, असं अमिताभ बच्चन यांनी लिहिल आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रिझर प्रदर्शित झाला आहे , ज्याला चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे.
पाहा व्हिडिओ-
थोडक्यात बातम्या-
“तुमच्या कुंडल्या तुम्हालाच तुरूंगात बसून पाहाव्या लागणार, आमच्या हातात सुद्धा बरचं काही आहे”
घटस्फोटानंतर राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा, म्हणाली…
“रिश्ते में हम आपके बाप लगते है; ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचंय ते लावा”
जिओला सर्वात मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटी ग्राहकांनी सोडली साथ
मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला
Comments are closed.