Top News

गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला- तात्याराव लहाने

Photo Credit- Tatyarao Lahane Facebook

अहमदनगर | गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला, असं पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलं आहे.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या सत्कारासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अहमदनगर येथे आले होते. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान तात्याराव लहाने बोलत होते.

धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली. मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन, असंही डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ – संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. लहाने यांना समहाभूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

थोडक्यात  बातम्या-

…अन् अजितदादांनी जुन्या मित्राला आस्थेनं विचारलं, “तुमची तब्येत बरी आहे ना?”

…तेव्हा तुमच्या मंत्र्यांना घरी पाठवलं हे विसरलात काय?- अण्णा हजारे

“कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं”

किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप!

जैश उल हिंद दहशतवादी संघटनेनं घेतली दिल्ली स्फोटाची जबाबदारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या