अहमदनगर महाराष्ट्र

माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो- तात्याराव लहाने

अहमदनगर | धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेलं आहे. याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली. मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन, असं डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या सत्कारासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अहमदनगर येथे आले होते. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान तात्याराव लहाने बोलत होते..

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कायम गोरगरीब लोकांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो, अशा शब्दात डॉ. तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रति भावना व्यक्त केल्या. आहेत.

डॉ. तात्याराव लहाने यांचा माझ्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करणे ही खरंतर माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

केंद्राची मोठी घोषणा, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार

धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त- इंदुरीकर महाराज

“मोदी सरकारने गांधीजींचा चष्मा घेतला, पण त्यांचा दृष्टिकोन घेऊ शकले नाहीत”

“ओबीसींच्या महाज्योतीला पैसे देताना हात थरथरतात का?”

गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला- तात्याराव लहाने

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या