‘पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी घेतले’; शांता राठोडांच्या आरोपावर लहू चव्हाणांनी सोडलं मौन, म्हणाले..
मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक नवनवीव ट्विस्ट येऊ लागले आहेत. पूजाच्या आत्महत्येमुळे शिवसेनेते नेते संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यानंतर पूजाच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित त्यांचा राजीमाना नका घेऊ अशी मागणी केली. यानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सोमवारी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पुढे येत धक्कादायक असे आरोप केले.
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांवर खूप दबाव आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रूपये दिल्याचा गंभीर आरोप शांता राठोड यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला होता. शांता राठोड यांनी केलेल्या या आरोपामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र पूजाच्या वडिलांनी शांता राठोड यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात टीव्ही 9 ने वृत्त दिलं आहे.
पूजाच्या मृत्यूबाबत कोण काय बोलतंय ते माहिती नाही. आम्ही आमच्या दु:खात आहोत शांताबाई या आमच्या लांबच्या नातेवाईक आहेत परंतु त्यांच्यासोबत कसलेच नातेसंबंध नाहीत असं सांगत लहू चव्हाण यांनी आरोपांवर जास्त काही बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, पूजाच्या आई वडिलांनी पैशापोटी स्वत:च्या लेकराची किंमत केली नाही. त्यांना चुलत आजीबद्दल काय वाटणार? समाजाची दिशाभूल झालेलीच आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत. पूजाचे आई वडील खोटं बोलत आहे, असा आरोपही शांता राठोड यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
संजय राठोडांनी आधीच राजीनामा दिला असता तर…- पंकजा मुंडे
धक्कादायक! अनैतिक संबंधात आणू शकतो अडथळा म्हणून केली पतीचीच हत्या
अवघ्या तीन वर्षात भाजपला रामराम ठोकत ‘या’ नेत्याने केली काँग्रेसमध्ये घरवापसी
सातारा जिल्ह्यातील कुटुंब राबवत आहे पाकिस्तानात ‘हा’ आगळावेगळा उपक्रम
शरद पवारांनी कोरोनाची लस घेत दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणाले…
Comments are closed.