बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वोच्च न्यायालयाने केली लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात

नवी दिल्ली | 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. यात 4 शेतकऱ्यांसह 3 भाजप कार्यकर्ते आणि 1 भाजप नेत्याचा समावेश आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. या घटनेची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.

लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरूवात झाली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होत आहे. ‘व्हायलन्स इन लखीमपूर खिरी लिडींग टू लॉस ऑफ लाइफ’ नावाने या प्रकरणाच्या सुनावणीला आज सुरूवात झाली आहे.

लखीमपूर खिरीच्या तिकोनिया या भागात हा हिंसाचार घडला. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मिश्रासह इतर अनेक जणांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण सरकार आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप विरोधीपक्ष करत आहेत.

दरम्यान, आशिष मिश्रा याने त्याच्यावर लागलेले आरोप फेटाळत घटनास्थळी उपस्थित नसल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरणात बरीच गरमा गरमी पाहायला मिळाली. बऱ्याच आरोप प्रत्यारोपानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली”

भाजप विरूद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार?, नवाब मलिकांचं भाजपला खुलं आव्हान

सैनिकहो तुमच्यासाठी!; देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा अभूतपूर्व सन्मान सोहळा

मोठी बातमी! प्राप्तिकर विभागाकडून 1050 कोटी रूपयांचा घोटाळा उघड

‘हे ही दिवस जातील, अपना टाईम भी आयेगा’, पवारांवरच्या छापेमारीवर संजय राऊत म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More