बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्राला न्यायालयाने दिली ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी प्रकरणाबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. विरोधी पक्षांनी आशिष मिश्राला अटक करण्याची मागणी लावून धरली होती. आशिष मिश्राला अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीबाबत आज महत्वाचा निर्णय दिला आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून आशिष मिश्राला अटक केल्यानंतर त्याची 12 तास चौकशी करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या तपास पथक अर्थात एसआयटीने आशिष मिश्राची 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने आशिष मिश्राला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस कोठडीच्या वेळी आशिष मिश्राची वैद्यकीय चाचणी देखील केली जाणार आहे. चौकशीच्या वेळी त्याला कुठल्याही प्रकारची बळजबरी केली जाणार नाही. तसेच चौकशीच्यावेळी आशिष मिश्रांचे वकील देखील उपस्थित राहतील, असं न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, लखीमपूर घटनेवरून विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यामुळे देशातील सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलंं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या-

”नेतेगिरी म्हणजे लुटणं नाही, फॉर्च्युनरने चिरडण्यासाठी मी राजकारणात आलो नाही”

“त्याचं आडनाव ‘खान’ असल्यानं त्याला त्रास दिला जातोय”

“अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी”

‘लखीमपूर घटनेवर मोदी-शहा गप्प का?’, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

‘बिग बाॅसच्या घरात गेले ही माझी चूक होती, मात्र…’- शिवलीला पाटील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More