बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाला समजून सांगावं, नाहीतर…”

सातारा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवली असताना ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांनी देश समाजासाठी काय केलं? ते नकलाच करतात. भोंग्यावरून बोलतात. हे भोंगे काय आता लागले आहेत का?, असा सवाल लक्ष्मण माने (Lakshman Mane) यांनी उपस्थित केला आहे. भोंग्याला हात लावाल तर प्रतिकार करण्यात येईल असा इशारा देखील माने यांनी दिला आहे.

मूठभर वर्ग सोडला तर राज ठाकरेंच्या पाठिशी कोणी नाही. त्यांच्याकडून दोन धर्मात द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाला समजून सांगावं. नाहीतर त्यांना अटक करावी. गरज पडल्यास राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करेन, असा घणाघात लक्ष्मण माने यांनी केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे कोणाचीतरी सुपारी घेऊन हे काम करत आहेत, असा आरोप माने यांनी केला. तर राज ठाकरेंनी त्यांच्या आजोबांकडून काहीतरी शिकायला हवं होतं, असा टोलाही लक्ष्मण माने यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

“हिंदू लोकांनो, तुम्ही चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील दोन मुलं ही…”

“ब्राम्हण मुठीतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करावी लागेल”

“पवार कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळे…”

टेंशन वाढलं ! कोरोनाच्या चौथ्या लाटेचं सावट, WHO म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More