बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसनं महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा”

मुंबई | परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर महाराष्ट्रातील राजकाण ढवळून निघालं आहे. परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर विरोधकांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. आता या प्रकरणावर काँग्रेस आमदार आणि वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खरे असल्यास काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून घ्यायला हवं, अशी मागणी लक्ष्मण सिंह यांनी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्राचे गृहमंत्री मुंबई पोलिसांकडून जर 100 कोटी रुपये प्रतिमहिना याप्रमाणं वसूल करत असतील आणि जर हे सत्य असेल तर देशमुख देशाचे मुख होऊ शकत नाहीत असं दिसत आहे, की आघाडी सरकार पिछाडीवर जात आहे. काँग्रेसनं आपलं समर्थन माघारी घ्यायला हवं, असं लक्ष्मण सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून असे मिळून शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितलं होतं, असं या पत्रात म्हटलं आहे. प्रत्येक महिन्याला ही वसूली करण्याचं वाझेंना टार्गेट देण्यात आलं होतं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसेच भारताचा खरा नागरिक म्हणून मी मागील 32 वर्षे पोलीस अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेला जागलो आहे. मी खाली नमूद केलेल्या मुद्द्यांची आपण दखल घ्यावी ही विनंती. तसेच तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाच्या संवैधानिक जबाबदाऱ्यांच्या पाठिशी उभे राहा, असंही परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती”

“आजचे हे अधिकारी अर्धी चड्डीच्या इशाऱ्यावर चाल सिंहाची दाखवतात, अन्…”

“जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?”

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर जयंत पाटील म्हणाले…

‘100 कोटीच्या हिस्सेदारांची नुसती धावपळ चालली आहे’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More