Top News मनोरंजन

दिवाळीच्या मुहूर्तावर फुटणार अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’

मुंबई | अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या रिलीजची तारिख अखेर ठरली आहे.

यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. खुद्द अक्षयने यासंदर्भात ट्विट करत याची माहिती दिली आहे. येत्या 9 नोव्हेंबर रोजी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा आगळ्या वेगळ्या विषयाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा यापूर्वी ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य झालं नाही. त्यानंतर पुन्हा अक्षय कुमारच्या वाढदिवशीच म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार होता. मात्र ते देखील जमलं नसल्याने अखेर 9 नोव्हेंबर तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या सिनेमात अक्षय एका तृतीयपंथी भूताची भूमिका साकारणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल- देवेंद्र फडणवीस

तज्ज्ञांशी संवाद सुरू असून मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करू- उद्धव ठाकरे

चिंताजनक! राज्यात आज 23 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या