लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; तात्काळ रुग्णालयात केलं दाखल

Lal Krishna Advani l माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी रात्री उशिरा दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. अडवाणी यांची वयोमानाच्या अस्वथतेमुळे प्रकृती निघड्ली होती. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना एम्सच्या हॉस्पिटलच्या जेरियाट्रिक विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचा राजकीय प्रवास :

लालकृष्ण अडवाणींच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी 1951 साली जनसंघाची स्थापना केली तेव्हा अडवाणी 1957 पर्यंत पक्षाचे सचिव होते. त्यानंतर 1973 ते 1977 पर्यंत त्यांनी जनसंघाचे अध्यक्षपद भूषवले. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा ते त्याचे संस्थापक सदस्य होते.

अडवाणी 1980 ते 1986 पर्यंत भाजपचे सरचिटणीस होते. 1986 ते 1991 पर्यंत ते भाजपचे अध्यक्ष होते. अडवाणी हे तीन वेळा भाजपचे अध्यक्ष होते. ते 5 वेळा लोकसभा आणि 4 वेळा राज्यसभेचे खासदार होते. 1977 ते 1979 या काळात ते पहिल्यांदा केंद्रात मंत्री झाले. या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला आहे.

Lal Krishna Advani l अडवाणींचे RSS संघाशी संबंध :

भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचे RSS संघाशी संबंध चांगले आहेत. देशभक्तीच्या भावनेमुळे त्यांचा कल आरएसएसकडे वाढू लागला. भारत देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला अगदी त्यावेळी लालकृष्ण अडवाणी हे स्वातंत्र्य साजरे करू देखील शकले नाहीत. कारण त्यावेळी लालकृष्ण अडवाणी हे पाकिस्तानात होते आणि त्यांना त्यांचे घर सोडावे लागले.

देशाच्या फाळणीनंतर ते कराचीहून दिल्लीत आले आणि त्यांनी राजस्थानमध्ये संघाचा प्रचार सुरू केला. त्यांनी दीर्घकाळ संघ प्रचारक म्हणून काम देखील केले आहे. 1947 ते 1951 या काळात आरएसएसच्या कराची शाखेचे सचिव म्हणून त्यांनी भरतपूर, अलवर, बुंदी, कोटा आणि झालावाड येथे आरएसएसचे कार्यक्रम आयोजित केले.

News Title – Lal Krishna Advani Admitted in Delhi AIIMS

महत्त्वाच्या बातम्या-

या राशीच्या व्यक्तींना उत्पन्नाची नवीन संधी मिळेल!

दिल्लीत निलेश लंकेंनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

आशिया कपचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार भारत vs पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना

“शिंदे-फडणवीसांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय, राज्यातले उद्योग गुजरातला पळवले”

मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, मात्र ‘हे’ जिल्हे अजूनही कोरडेच; शेतकऱ्यांची चिंता वाढली