Lalit Patil Drugs | पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या विकासासह पुणे शहरात वाढती गुन्हेगारी पाहायला मिळत आहे. तसेच पुणे शहरात ड्रग्ज रॅकेट देखील सुरू आहे. त्यातच ललित पाटील ड्रग्ज (Lalit Patil Drugs) प्रकरण हे चर्चेत आलेला विषय होता. याचप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी पुणे पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन केलं आहे.
ललित पाटील प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल
चौकशी दरम्यान आढळल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. या प्रकरणात ससून रूग्णालयातील कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 3150 पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. (Lalit Patil Drugs)
ललित पाटील ड्रग्स (Lalit Patil Drugs) प्रकरणातील दोन सरकारी पोलीस कर्मचाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस मुख्यालयातील हे दोन सरकारी कर्मचारी काम करत आहेत. पोलीस आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी दोघांची नावे आहेत.
दोन सरकारी कर्माचाऱ्यांचं निलंबन
ललित पाटील हा पळून गेल्याची माहिती ही आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडेने काही तास उशीरा दिली होती. यामुळे ललित पाटील यांना पकडता आले नाही. सध्या या दोघांचं सरकारी सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. (Lalit Patil Drugs)
ललित पाटील हा येरवडा जेलमध्ये होता. मात्र तो कारागृहात न राहता महिनोमहिने ससून रूग्णालयात राहत होता. त्यानंतर तो रूग्णालयातून तो हवे तेव्हा हॉटेलमध्ये जाताना दिसत होता. ही गोष्ट समोर येताच पोलीस कर्मचाऱ्यांचं बिंग फुटलं. त्यानंतर ललित पाटील ससून रूग्णालयातून फरार झाला.
News Title – Lalit Patil Drugs Case In Two Employees Dismissed From Service Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
गुड न्यूज! आज स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर
आज ‘या’ 4 राशींच्या संपत्तीत होणार प्रचंड वाढ!
“मुस्लिम समाजाच्या ‘या’ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका”; मनसे आक्रमक
वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्माची अजून एक मोठी घोषणा!
“अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावं, मी मंत्री व्हावं”; पांडुरंगाला कुणी घातलं साकडं?