नितीन पटेलांना मुख्यमंत्री न केल्यास गुजरात बंद- पाटीदार

अहमदाबाद | नितीन पटेल यांच्या नाराजीनंतर त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. नितीन पटेल यांना मुख्यमंत्री न केल्यास राज्यव्यापी बंद पुकारण्याचा इशारा पाटीदार समाजाने दिलाय. 

सरदार पटेल ग्रुपचे प्रमुख लालजी पटेल यांनी 1 जानेवारीला मेहसाणा बंदची हाक दिलीय. मागणी मान्य न झाल्यास पाटीदार समाज संपूर्ण गुजरातमध्ये बंद पुकारेल, असं त्यांनी जाहीर केलंय. 

मी नितीन पटेल यांच्या समर्थकांना भेटलो आहे. नितीन पटेल यांना दोन वेळा डावलण्यात आल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आम्ही बंद पुकारण्याचा निर्णय घेतला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.