भाजपच्या लोहपुरुषाच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त

नवी दिल्ली | राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त झाला. भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांच्या राजकारणातील उरल्या-सुरल्या आशा संपुष्टात आल्या.

१९४२ पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. १९५१ साली स्थापन झालेल्या जनसंघाचे ते सदस्य होते. १९७० साली जनसंघाकडूनच ते राज्यसभेवर गेले. आणिबाणीनंतरच्या मोरारजी देसाई मंत्रिमंडळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. 

बाबरी मशिद पाडण्यापूर्वी काढलेल्या रथयात्रेमुळे अडवाणी प्रसिद्धीझोतात आले. पुढे वाजपेयी सरकारच्या काळात ते उपपंतप्रधानही बनले. दरम्यान, बाबरीकाडांची हीच जुनी केस सुनावणीस आल्याने त्यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर पाणी सोडावे लागले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या