नवी दिल्ली | संपूर्ण देशआत भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विरोधी पक्षांचा दारूण पराभव केला. या विराट विजयानंतर नरेंद्र मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची आज सकाळी भेट घेतली.
अडवाणींची भेट घेऊन त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपाध्यक्ष अमित शहादेखील उपस्थित होते.
लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.
लालकृष्ण अडवाणी यांना भेटल्यानंतर मोदी आणि शहा भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना भेटण्यासाठी जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
-भाजपनं नक्कीच मोठा ‘गेम’ खेळलाय- शत्रुघ्न सिन्हा
-मोदी समर्थकाची अनुरागच्या मुलीला बलात्काराची धमकी; अनुरागचा मोदींना सवाल
-मुहूर्त ठरला!!! या दिवशी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ
-सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर शब्दफुलांचा वर्षाव
-प्रचारातली जुगलबंदी विसरुन शिवतारेंनी दाखवला दिलदारपणा!
Comments are closed.