नवी दिल्ली | राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली.
लालू प्रसाद यादव यांची प्रकृती ढासळत चालल्याने चांगले उपचार मिळावेत यासाठी लालू प्रसाद यादव यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात हलवण्यात आलंय.
लालू यांना रूग्णवाहिकेने बिरसा मुंडा विमानतळावर नेण्यात आलं. तेथून हवाई रूग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
पुण्यात आगींचं सत्र सुरुच; रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा डेपोला भीषण आग
माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही- अनिता बोस़
लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटून भीषण अपघात!
ममता बॅनर्जी यांनी मोदींच्यासमोरच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांना झापलं
‘आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण’; पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक