बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

नवी दिल्ली | बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव यांच्यावर रांचीतील रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र लालूंची तब्येत सातत्याने बिघडत असल्याने डॉक्टरांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणी (Fodder Scam Case) पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रांचीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, लालूंच्या तब्येतीत सातत्याने बिघाड होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लालू प्रसाद यादव यांची क्रिएटीव्ह लेवल वाढल्याचं रांची येथील रूग्णालयातील डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमची तातडीची बैठक बोलवण्यात आली व या बैठकीत लालू प्रसाद यादव यांना दिल्लीला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आमची पुर्ण टीम लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीबाबत चिंतेत आहे. सर्व विचार करून आम्ही लालू प्रसाद यादव यांना एम्स रूग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला असल्याचं रांचीतील डॉक्टरांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

टेन्शन वाढलं! महाराष्ट्रातील Deltacron रूग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर नाना पटोले कडाडले, म्हणाले…

‘आगे आगे देखिए होता है क्या’, नारायण राणेंनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई, राजकीय वर्तुळात हालचालींना वेग

“…तर तो माझा शेवटचा क्षण असेल”, पंकजा मुंडेंचं भावनिक प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More