बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर

नवी दिल्ली | आज राष्ट्रीय जनता दलाचा आज 26 वा वर्धापन दिन आहे. या दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे रुग्णालयात दाखल असल्या कारणाने आज कोणताही भव्य उत्सव साजरा न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाने सर्व जिल्हा मुख्यालयात सदस्यत्व मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाटणा येथील राबरी निवासस्थानी शिडीवरून उतरत असताना त्यांचा तोल गेला व ते पडले. त्यांना कमरेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून सध्या ते रूग्णालयात उपचार घेत आहेत.

लालू प्रसाद यांची मुुलगी रोहिणी आचार्य हिने एक भावनिक पोस्ट शेअर केली. या फोटोमध्ये वडिल माझ्यासाठी हिरो असून लवकरात लवकर बरे व्हा असे कॅप्शन दिले आहे. पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त लालू प्रसाद यांच्याशी व्हिडीओ काॅलिग द्वारा संवाद साधला. त्यातीलच काही फोटो लालू प्रसाद यादव यांच्या मुलीने शेअर केले आहेत.

पारच एमएचआर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सकाळी डाॅक्टराची एक टिम त्यांना तपासून गेली आहे. त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा दिसून येत असल्याच त्यांनी सांगितल आहे. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या 

उद्धव ठाकरेंना बावरट करणारे ‘ते’ चार जण कोण?, गुलाबरावांचा रोख कुणाकडे???

‘ज्या चार लोकांच्या नावानं बोटं मोडता, त्या चार लोकांंमुळेच…’, संजय राऊत कडाडले

‘शरद पवार म्हणजे काही…’, केतकी चितळे स्पष्टच बोलली

‘एखाद्या सांगाड्यासारखं हे सरकार भाजपच्या रुग्णवाहिकेतून अवतरलं आहे’, शिवसेनेचा घणाघात

‘हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More