बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हे पाहून अतिशय दु:ख होतय’; लालू प्रसाद यादव यांनी मोदींना सुनावलं

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे लसींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र लसींचा पुरवाठा कमी होत असल्याने देशात कोरोना लसींची टंचाई निर्माण झाल्याचं दिसत आहे. यावरून राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

आज लोकांकडून पैसे घेऊनही लस उपलब्ध करता येत नाहीये हे पाहून अतिशय दु:ख होत आहे. या महासाथीच्या काळात देशभरातील लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांचं मोफत लसीकरण करण्याची त्यांनी घोषणा करावी अशी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत आहेत, असं लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं.

राज्य आणि केंद्रासाठी लसींची किंमत निरनिराळी असू नये. राज्यांमुळेच देशाची निर्मिती होते. प्रत्येक नागरिकाचं लसीकरण टप्प्याटप्प्यानं मोफत झालं पाहिजे ही केंद्राची जबाबदारी असल्याचंही लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं.

दरम्यान, 1996-97 मध्ये जेव्हा देशात जनता दलाचं सरकार होतं तेव्हा आम्ही पोलिओ लसीकरणात जागतिक विक्रम केला होता, असं लालू प्रसाद यादव म्हणाले. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची तुलना 1996-97 सालच्या पोलिओ लसीकरण मोहिमेशी केली.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं नशीब”

कुठल्याही हमीशिवाय PPF खात्यावर मिळणार कर्ज; फक्त ‘या’ अटी करा पूर्ण

‘केंद्राने लसीचा साठा पाठवला पण…’; भाजपच्या या बड्या नेत्याचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

…अशी कामगिरी करणारा भारत बनला जगातील पहिला देश!

“एकीकडं मोदी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत दुसरीकडे दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More