नवी दिल्ली | बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी (Fodder Scam Case) न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, तब्येत सतत खालावत असल्याने त्यांच्यावर रिम्सच्या पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
लालू प्रसाद यादव यांची किडनी सातत्याने खराब होत आहे. त्यांची किडणी 80 टक्क्यांहूनही अधिक खराब झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात डायलिसिस (Dialysis) आवश्यक असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
लालू प्रसाद सध्या किडनीचा त्रास, मधुमेह, रक्तदाब अशा अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांच्या किडनीची स्थिती जर अशीच राहिली तर त्यांना लवकरच डायलिसिस सुरू करावं लागू शकतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, लालू प्रसाद यांना चारा घोटाळा प्रकरणात न्यायालयाने पाच वर्षांच्या शिक्षेसह 60 लाखांचा दंड देखील ठोठावला आहे. लालू प्रसाद यादव दीर्घकाळापासून अनेक आजारांनी त्रस्त आहेत. याचा आधार घेत लालूंच्या जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली असून 11 मार्च रोजी यावर सुनावणी होणार आहे.
थोडक्यात बातम्या-
रशिया युक्रेनवर ‘हा’ मोठा हल्ला करण्याच्या तयारीत?, अमेरिकेने दिला सतर्कतेचा इशारा
भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, गोव्यात मुख्यमंत्री कोणाचा?
कुणाला मिळणार जनतेचा कौल?; 5 राज्यांचं भवितव्य ठरणार
“…हे तर लोकशाहीचा गळा घोटण्यासारखंच”, उच्च न्यायालयाचे ताशेरे
“घातपाताची आम्हाला शंका होती, आतमध्ये सगळे एकमेकांवर आदळत होते अन्…”
Comments are closed.