बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांना न्यायालयाचा दणका, ‘इतक्या’ वर्षांची सुनावली शिक्षा

रांची | बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दारोंडा चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच लालू प्रसाद यादव यांना 60 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

दारोंडा हे सर्वात मोठं चारा घोटाळा प्रकरण होतं. 15 फेब्रुवारी रोजी रांचीतील न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने यादव यांना शिक्षा सुनावली आहे.

लालू प्रसाद यादव यांना या पाचव्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. दारोंडा चारा घोटाळा प्रकरणापूर्वी लालू प्रसाद यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या जामिनासाठी अर्ज केला जाणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. मात्र, लालू यादव यांचा अर्ज जामीन अर्ज मंजूर होईपर्यंत त्यांना तुरूंगातच राहावे लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता लवकरच…

“गधे को दिया मान.. गधा पहुँचा आसमान”

“मुख्यमंत्री केलं तेव्हा नारायण राणे काय धुतल्या तांदळाचे होते का?”

मोठी बातमी! नारायण राणेंच्या बंगल्यावर मुंबई पालिकेचं पथक रवाना

मोठी बातमी! मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More