बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांशिवाय संसद शांत वाटते- लालू प्रसाद यादव

नवी दिल्ली | दिल्लीध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी सर्व विरोधकांना एकत्र करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राजदचे नेते लालू प्रसाद यांनी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह आणि त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

या भेटीनंतर लालू प्रसाद यांनी माध्यमांशी संवाद साधला असता शरद पवार-मुलायम सिंह यांच्या भेटीबाबत भाष्य केलं. शरद पवार यांची प्रकृती बरी नव्हती. मी त्यांना भेटण्यासाठी आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. शरद पवारांशिवाय संसद शांत वाटत आहे. मी, शरद पवार आणि मुलायम सिंह यादव असे आम्ही तिघे खुप वर्ष वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी राजकीय लढा दिल्याचं लालू प्रसाद यादव म्हणाले. त्यासोबतच त्यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं.

चिराग पासवान-तेजस्वी यादव हे मला वाटतं ते एकत्र येतील. आम्ही बिहारमध्ये सरकार स्थापन करणार होतो. मी तुरूंगात होतो, पण माझा मुलगा तेजस्वी हा भाजप आणि जदयूशी एकटा लढला. त्यांनी आम्हाला धोका दिला आणि 10 ते 15 मतांनी हरवलं, असं लालू प्रसाद यादव म्हणाले.

दरम्यान, राजकीय बड्या नेत्यांच्या भेटी-गाठी वाढण्याला उत्तर प्रदेशसह आणखी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

“सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं”

अमित शहा आणि शरद पवारांच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? पवार म्हणाले…

माझ्यावर दिवसाला 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार- चित्रा वाघ

“जोपर्यंत कोरोना कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More