लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखी खालावली, महत्त्वाची माहिती समोर
नवी दिल्ली | राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि जेष्ठ राजकारणी लालू प्रसाद यादव यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी खालावली होती. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट करत दिली होती. पटना येथील राबरी या निवासस्थानी दादर उतरताना यादव यांचा तोल जाऊन ते पडले होते.
गेले दोन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत काल गुरुवारी सकाळपासून त्यांच्या शरीराची हालचाल मंद झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हालविले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी त्यांच्या समर्थकांना त्यांच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे.
पटना येथील घरी दादरवरून पाय घसरुन पडल्याने यादव यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली होती. तीन ठिकाणी फ्रॅक्चर असल्याची देखील माहिती कळत होती. सुरुवातीला त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. नंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हालविण्यात आले.
औषधांची मात्रा अधिक झाल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत आहेत. लालूंची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी त्यांचे समर्थक आणि राष्ट्रीय जनता दलचे नेते, कार्यकर्ते बिहारमध्ये गोपालगंजपासून पटन्यापर्यंत ठिकठिकाणी अनेक मंदिरांमध्ये पूजाअर्चा आणि होमहवन करत आहेत.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट, शिंदे गटाच्या आमदारांना राग अनावर
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
शहाजीबापू पाटलांवर मोठं संकट, थोडक्यात बचावले; वाचा सविस्तर
Comments are closed.