लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

रांची | चारा घोटाळ्याप्रकरणी राजदचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. तसेच त्यांना 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. 

लालूप्रसाद बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचा हात होता.

दरम्यान, चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण 6 खटले सुरु आहेत. यापैकी एका खटल्यात त्यांना 5 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आलाय. मात्र ते याप्रकरणी जामीनावर आहेत.

 

Google+ Linkedin