चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

लालूप्रसाद यादव

नवी दिल्ली | चारा घोटाळ्याप्रकरणी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांना मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने झारखंड उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवत चारा घोटाळ्याप्रकरणी प्रत्येक खटला वेगळा चालणार आहे. याशिवाय षडयंत्र रचल्याच्या आरोपाखाली आणखी एका खटल्याला लालूप्रसाद यादव यांना सामोरं जावं लागणार आहे. सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.