जेवण आवडलं नाही, मग लालू स्वतःच बनले स्वयंपाकी!

रांची | चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळलेले लालूप्रसाद यादव यांना तुरुंगातील स्वयंपाक आवडला नाही, त्यामुळे ते स्वतःच स्वयंपाकी बनल्याचं समोर आलंय. 

लालूप्रसाद यादव यांना खाण्याचा शौक आहे हे सर्वश्रुत आहे. मात्र रांचीच्या बिरसा मुंडा जेलमध्ये त्यांनी रवानगी झाल्यानंतर त्यांना जेलचं जेवण काही रुचलं नाही त्यामुळे त्यांनी थेट स्वयंपाकखोलीचा ताबा घेतला. 

लालूप्रसाद यादव यांनी स्वयंपाक बनवला आणि आपल्या तुरुंगातील सहकाऱ्यांनाही खाऊ घातला. त्यांच्या जेवणाची तुरुंगात सध्या चांगलीच स्तुती होत असल्याचं कळतंय.