बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टॅक्सीत प्रवाशी आहेत की नाही हे बाहेरुनच कळणार; मुंबईतील वाहनांवर दिवे लागणार

मुंबई | मुंबईतील काळ्या- पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षाच्या टपावर परदेशाप्रमाणे दिवे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे टॅक्सी- रिक्षा यात प्रवासी आहेत की नाही याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. परिवहन विभागाकडून मुंबईत राबवण्यात येणारा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

काहीवेळा टॅक्सी- रिक्षात प्रवासी असल्याचं दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण होते. प्रवाशांची हिच समस्या लक्षात घेऊन टॅक्सी आणि रिक्षाच्या टपावर लाल आणि हिरवा दिवा बसवण्याचा  निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

शहरात वाढत असलेल्या इ-टॅक्सी, बेस्टची भाडे कपात तसेच इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि चालकांच्या व्यवसायावर मंदी आहे. त्यातच आता टपावर दिवा बसवण्यासाठी 700 ते 800 रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

नव्या वर्षात या योजनांची अंमलबजावणी परिवहन मंडळाकडून करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरात टॅक्सीची संख्या 30 हजारावर आहे. तर रिक्षांची संख्या 1 लाख इतकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More