पुणे | मुळशी तालुक्यातील मुळशी धरण परिसरातील गावे वडगाव (वाघवाडी) आणि लिंबारवाडी या गावांत जमिनीला तडा जाऊन भेगा पडल्या आहेत. त्यामुळे गावकरी भयभीत झाले असून परीसरात भितीचे वातावरण आहे. यामागचे कारण शोधण्यासाठी आणि नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला (Geological Survey of India) पाचारण करुन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे.
सुरक्षेच्या कारणासाठी मुळशी धरण (Mulshi Dam) परिसरातील गावांतील नागरीकांचे जिल्हा प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. तसेच मुळशी धरण परिसरात नोंदवली गेलेली कंपने आणि जमीनीला पडलेल्या तडा ह्या भूकंपाच्या नसून अतिशय कमी तीव्रतेच्या असल्याची माहिती टाटा पॉवरकडून (Tata Power) देण्यात आली आहे.
मुळशी तालुक्यातील धरण भागाजवळील मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी येथे 500 मीटर परिसरात जमीनीला तडा गेल्या आहेत. टाटा पॉवर कंपनीने मुळशी धरण परिसरात भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाल्याचे सर्वात अगोदर कळविले होते. मात्र, त्यांच्याकडून हा भूकंप नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. नोंद करण्यात आलेली कंपने ही फार कमी तीव्रतेची (0.2 जी) असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता भूकंपाची जरी भिती नसली तरी, ह्या भेगा का पडल्या? याचा तपास करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. जोपर्यंत सर्वेक्षण सुरु रहाणार आहे, तोपर्यंत येथील नागरीकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याची जबाबदारी टाटा पॉवरने घेतली आहे.
थोडक्यात बातम्या –
‘घोटाळे करायचे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि…’,आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर टीका
‘फुटीर गट चंद्रावर देखील कार्यालय स्थापन करतील एवढे ते…’, संजय राऊतांचा हल्लाबोल
तिसऱ्यांदा आई बनणार करिना कपूर?, पोस्ट करत म्हणाली…
“दिल्लीच्या दरबारात शिंदे बाद’शहां’च्या भेटीविना 12 तास तात्कळत बसले”
आमदारांच्या अपात्रतेवर आज निकाल; शिंदे सरकारचं भविष्य ठरणार
Comments are closed.