वाल्मिक कराडची संपत्ती काही संपेना; ‘या’ ठिकाणी 9 एकरावर आलिशान रिसॉर्ट

Land Grabbing Allegations on Walmik Karad Wife

Walmik Karad | बीड (Beed) जिल्ह्यातील बहुचर्चित खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याची पत्नी ज्योती जाधव (Jyoti Jadhav) हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ज्योती जाधव हिच्या नावावर मांजरसुंबा (Manjarsumba) परिसरात ९ एकर जमीन असून, तिने या भागातील एकूण ५० एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे तर, शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम (Murum) काढून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या पत्नीच्या नावे बीडच्या मांजरसुंबा येथे ९ एकर जमीन असल्याचे समोर आले आहे. या जमिनीवर रिसॉर्ट (Resort) उभारण्याची तयारी सुरू होती. मात्र, केवळ ९ एकरच नव्हे तर, या परिसरात ५० एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा आवाज

या प्रकरणात आता मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. शेतकरी मुकेश रसाळ (Mukesh Rasal) यांनी आरोप केला आहे की, ज्योती जाधव यांनी त्यांच्या शेतातील मुरुम काढून स्वतःच्या शेतात टाकला. जमीन खरेदी केल्यापासूनच आम्हाला त्रास सुरू झाला. आमच्या शेतातील मुरुम काढण्यात आला. आम्ही प्रशासनाकडे (Administration) तक्रार दिली होती, पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही, असेही मुकेश रसाळ यांनी म्हटले आहे. (Walmik Karad)

शेतकऱ्यांनी जुलै २०२४ पासूनच प्रशासनाकडे तक्रार केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाने या तक्रारींवर गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.

सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा पुरावा

दरम्यान, मस्साजोग (Massajog) येथील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले आहे.

ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे (Aavada Power Company) खंडणी मागितली त्याच दिवशी, म्हणजे २९ नोव्हेंबर २०२४ रोजी, सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणातला हा सर्वांत मोठा पुरावा असल्याचे बोलले जात आहे. (Walmik Karad)

Title : Land Grabbing Allegations on Walmik Karad Wife

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .