बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लँड रोवरची शानदार डीफेंडर व्ही 8 झाली लाँच, जाणुन घ्या किंमत!

नवी दिल्ली | लँड रोव्हरने नुकतेच जागतीक स्तरावर त्याचे डीफेंडर व्ही 8 लाँच हे माॅडल केलं आहे. या नवीन कारला आतल्या बाजूने ऑल ब्लॅक फिनीशिंग देण्यात आलं असून याचे काही फीचर्स बऱ्याच स्टँडर्ड माॅडेलशी मिळतं जुळतं आहे. या नवीन लँड रोव्हर डीफेंडर व्ही 8 ची अमेरिकामध्ये 108,000 डाॅलर्स तर भारतात 78 लाख रुपये एवढी किंमत ठेवण्यात आली आहे.

लँड रोव्हर डीफेंडर व्ही 8 मध्ये 5.0 लीटर, व्ही 8 मोटर आहे जी 511 बीएचपी आणि 625 एनएम पीक टाॅर्क जनरेट करते. ही कार 240 किमीताशी वेगाने धावू शकते. तसेच 506 सेकंदात ही कार तीन अंकी वेग घेऊ शकते. याआधी भारतात लाँच झालेल्या शेवटच्या डिफेन्डर PHEV P400e हे माॅडेल 2.0 लिटर, फोर सिलेंडर, बीएस 6 पेट्रोल इंजिनवर चालते. हे माॅडेल 5.6 सेकंदात ताशी 100 किमी वेगाने धावू शकते.

लँड रोव्हर एलईडी बाॅक्स आणि बाॅक्सी सिल्हूट टिकून ठेवणाऱ्या टेललाईट्समध्ये अ‌ॅल्यूमिनियमच्या कास्टींगसोबत अनेक फीचर्स जोडले आहेत. तसेच टेरेन रिस्पॅान्स 2 सिस्टीम अ‌ॅडजेस्ट करण्यासाठी काॅन्फिगर केले जाऊ शकतं आणि ऑफ रोडवर जात असताना स्वयंचलितपणे 145 मिमी पर्यंत वाढते. या कारच्या सस्पेन्शन ग्राउंड क्लियरन्समध्ये 900 मिमी ची डेप्थ असून ती कमी करता येऊ शकते.

दरम्यान, 2020 मध्ये विकल्या गेलेल्या गाड्यांना सुरक्षतेसंबंधित चाचणी लागू असल्याची माहिती युरो एनसीएपीने सांगितली आहे. तसेच सिल्ट बेल्ट प्रीटेन्शनर्स, लोड लिमीटर्स, आयसोफीक्स टीथर आणि एअरबॅग स्वीच देखील देण्यात आले आहेत. जर ही कार अचानक एखाद्या गोष्टीवर अढळते तर ऑटोमॅटीक ब्रेक सिस्टम काम करते, अशी संपुर्ण माहिती देखील एनसीएपीने दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांची महाविकासआघाडीवर सडकून टीका

…तर मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचं सत्य बाहेर येणार नाही- संजय राऊत

‘…नाहीतर काही लोक स्वत:साठी मागतात’; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला

मनसुख हिरेनची हत्या की आत्महत्या? प्रत्यक्षदर्शीनं केलाय सर्वात मोठा खुलासा…

वडील आणि 84 वर्षीय आजोबांची हत्या करून तरूणाने उचललं धक्कादायक पाऊल!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More