बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात भूस्खलन; गावातील नागरिकांना हलवण्याचे आदेश

सातारा | काही दिवसांपुर्वी मुंबईतील मुसळधार पावसामुळे विक्रोळीतील पंचशील नगर भागात पावसामुळे पाच-सहा घरांवर दरड कोसळली. त्यात काही नागरिकांचा मृत्यु देखील झाला होता. मुंबईसह आता संपुर्ण महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात देखील अतिवृष्टी झाल्यानं एका गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गुंजाळी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. गावात भूस्खलन झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांंनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर प्रशासनने गावातील नागरिकांना हलवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तर वाई तालुक्यातील जांभाळी या गावात देखील भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे.

गुंजाळी गावच्या नागरिकांना अचानक जमिन खचत असल्याचं दिसलं. त्यानंतर गावच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. पुन्हा त्याच ठिकाणी भूस्खनल होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनाने गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत कोणतंही नुकसान झालेलं नाही.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही लोकांना सुरक्षित स्थळी देखील पोहचवण्यात आलं आहे. येत्या काळात पावसाचा जोर वाढल्यास कोयनातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा टाकणाऱ्या महाराष्ट्रावर संकट, मोदींनी सढळ हाताने मदत करावी”

चिपळूण आणि खेड भागात भीषण परिस्थिती; NDRF च्या तुकड्या तैनात

महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; बचावकार्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून हेलिकॉप्टरची मागणी

मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, वाचा आकडेवारी

‘केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More