बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गब्बर सेनेकडून लंकादहन; 7 गडी राखून भारताचा श्रीलंकेवर दमदार विजय

मुंबई | श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं 7 गडी राखून दमदार विजय मिळवला आहे. भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळी करत सामना 80 चेंडू राखून जिंकला आहे. या सामन्यात कर्णधार शिखर धवनने आक्रमक खेळी करत सर्वाधिक धावा केल्या आहेत. या सामन्यातील विजयाबरोबर आता भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

सर्वप्रथम नाणेफेक जिंकून श्रीलंकेने फलंदाजी केली. दीपक चहर सोबतच कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांच्या शानदार गोलंदाजीने भारताने श्रीलंकेला 9 बाद 262 धावांवर रोखले. भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर श्रीलंकेने नियमित अंतरात बळी गमावले. यजमानांकडून कोणालाही अर्धशतक करता आले नाही. दिपक चहर आणि कुलदीपने दोन बळी घेतले. तर कृणाल पांड्याने फक्त 26 धावा देऊन एक बळी घेतला. श्रीलंकाकडून चमिका करुणारत्ने याने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या.

श्रीलंकेने दिलेल्या 263 धावांचं आव्हान पुर्ण करताना सलामवीर शिखर धवन आणि पृथ्वी शाॅने आक्रमक सुरवात केली. भारतीय संघानं पहिल्या 10 षटकात 91 धावा केल्या होत्या. कर्णधार शिखर धवनने संयमी खेळी केली. त्याने 95 चेंडूत 86 धावांची खेळी केली. तर दुसरीकडे पृथ्वी शाॅ, बर्थडे बाॅय इशान किशन , मनिष पांडे  आणि सुर्यकुमार यादव यांनी दुसरी बाजूने फटकेबाजी करत धावसंख्या पुढे नेली. शेवटी 80 चेंडू राखून भारताने सहज विजय मिळवला.

सध्या भारताची एक टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. तर भारताची B टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारताच्या या नव्या संघाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. तर भारताला चांगली सुरवात करून दिलेल्या पृथ्वी शाॅची तुलना विरेंद्र सेहवाग सोबत केली जात आहे. पृथ्वीने काल 24 चेंडूत 43 धावांची धमाकेदार खेळी केली होती.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच ‘या’ राज्यात मिळणार प्रवेश

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

“काहीही झालं तरी महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं”

“आपल्या करिअरचं काही सांगता येत नाही, सेव्हिंग्स पाहिजेच”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ‘एवढे’ लाख नागरिक बाधित होतील; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More