अशी घ्या तुमच्या लॅपटॉपची काळजी, कधीच होणार नाही हँग

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | लॅपटाॅप (laptop) हा आता दैनंदिन आयुष्यातील जगण्याचा एक भाग बनला आहे. प्रत्येकांच्या घरी हल्ली लॅपटाॅप असतोच. अभ्यासासाठी, कामासाठी लॅपटाॅप हल्ली सर्रास वापरला जातो. अनेक फाईल्स, प्रेझेंटेशन ऑफिस काम आपण लॅपटाॅपवर करतो.

कामामुळे अनेकदा लॅपटाप स्लो व्हायला लागतो. अचानक काम करताना लॅपटाॅप हँग झाला की अनेकदा चिडचिड व्हायला लागते. अचानक बॅटरी (battery) कमी व्हायला लागते, स्टोरेज लवकर भरायला लागतं अशा अनेक समस्या जाणवतात.

त्यामुळे असं होऊ नये यासाठी लपटाॅपची काळजी आधीपासूनच घेणं गरजेचं आहे. अनेकजण मल्टीटास्किंग (Multitasking) करण्याच्या नादात लॅपटाॅपचे अनेक विंडोज ओपन ठेवतात. ज्यामुळे लॅपटाप लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं काही करु नका.

लॅपटाॅप हा कामासाठी आपण वापरत असतो. त्यामध्ये अनेक काही पर्सनल गोष्टी असतात. त्यामुळे लॅपटाॅप हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या लॅपटाॅपमध्ये अँटी व्हायरस (Anti virus) असणं गरजेचं आहे.

अनेकदा कामाच्या फाईल्स(files) किंवा फोटोज लॅपटाॅपमध्ये भरभरुन असतात. ते वरचेवर आपण डिलीट करत असतो. मात्र तो डिलीट करणं हा पर्याय नाही आहे. डिलीट केल्यानंतर रिसायकलबीन मध्ये असलेली मेमरी वरचेवर डिलीट करत जा.

तसेच वरचेवर तुम्ही लॅपटाॅप रिस्टार्ट करु शकता. या सगळ्या ट्रिक्स वापरुन तुम्ही तुमचा लॅपटाॅप स्लो आणि हँग होण्यापासून वाचवू शकता.

महत्त्वाच्या बातम्या